मराठीसृष्टीवरील या विभागात आपण करणार आहोत चर्चा विविध विषयांवर. रोजच्या व्यवहारातील वेगवेगळे प्रश्न आणि त्यावरील आपली मतं रोखठोकपणे मांडण्यासाठीचं हे मुक्त व्यासपीठ. लिखाणाचे नियम अर्थातच मराठीसृष्टीचे नेहमीचे….
लेखकः अनंत कुलकर्णी, ठाणे आघाडी सरकारचे वाभाडे युतीने काढले आणि युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्तीचे आश्वासन युतीने दिले होतेच. त्याला अनुसरुनच युतीने निर्णय घेतला आणि फालतू टोल नाके बंद केले. जे टोलनाके जनतेला त्रासदायक वाटत होते ते तसेच राहिले. मुंबईत प्रवेश करताना अजूनही टोल भरायला लागतोच. ठाण्याहून दररोज मुंबईत जाणार्यांचे रोजचे ७० रुपये आणि अर्धा तास बरबाद होतोच. परट्रोल – डिझेल जळते ते वेगळेच. पण सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक बाब ही आहे की हे टुकार टोलनाके बंद झाले तरीही त्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या आमदारांनी फटाके वाजवले….. सेलेब्रेशन केलच…. सरकारी गाड्यांमधून फुकट फिरणार्यांना जनतेची दुःख काय कळणार? कॉंग्रेंस असो की राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना.. सगळे एकाच माळेचे मणी….
अनिल नाचणे, मुंबई राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय… राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा… हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!! […]
हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं… एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील ….. Anil Nachane – anc@gmail.com
आनंद लिमये या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे. आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं…. जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची. हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी आनंद लिमये
या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत. कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं… निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?
खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा…
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि मुंबईतले ५५ पूल बांधल्यावर तिथे जो टोल नावाचा राक्षस ऊभा झाला तो त्यानंतर शांत झालाच नाही. आता महाराष्ट्रात टोल संस्कृती चांगलीच रुजलेय. कोणी कितीही ओरडलं तरी टोल बंद होण्याची शक्यताच नाही. नव्या सरकारला सहा महिन्यातच याची प्रचिती आली आणि आता तर त्याची कबुलीच सरकारने दिली. […]
हे तर अगदी फारच झाले.. आता पुरे झाले यांचे लाड… सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ? ठाणे आणि पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनातून इतका पैसा उरला तो वापरा की. सुभाष जयवंत
मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि पंजाब सरकारचे सहाय्य, तसेच इतरही मार्गातून पैसे मिळत असताना पाच लाख रुपयाच्या थेट प्रक्षेपणासाठी सरकारची पुन्हा मनधरणी करणे योग्य आहे का? […]