सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.
अमेरिकेमधे लोकांना सेल (Sale) चे भयंकर वेड आहे. इथे कायम कसला ना कसला सेल चालू असतो. न्यू इयर, व्हॅलेंटाईन, इस्टर, मदर्स डे, फादर्स डे, प्रेसीडेंट्स डे, मेमोरियल डे, लेबर डे, हॅलोवीन, हे ठरावीक निमित्ताने होणारे सेल झाले. त्याशिवाय प्रत्येक सीझन सुरू होण्याआधी, (स्प्रींग, समर, फॉल, विंटर) त्या त्या सीझनचा सेल असतो. झालंच तर सीझन संपत आला […]
अगदी छोट्या (चार-पाचशे वस्तीच्या) गावांमधे तर सगळेजण एकमेकांना ओळखतात. थोड्या मोठ्या (दोन-चार हजार वस्तीच्या) गावांमधे सगळ्यांच्या ओळखी नसल्या तरी ओळखीचं हास्य तरी असतं. गाडीतून, पिक-अप ट्रकमधून जाता येताना एकमेकांना हात वर करून ओळख दाखवणं, हा सर्वसाधारणपणे शिरस्ता असतो. नवीन लोकांना देखील गाडीतून जाताना ओळखीचं हास्य किंवा हात वर करून दाखवणार. गावातल्या छोट्याश्या पोलीस ठाण्यामधे मोजून असणार […]
छोट्या गावांमधे, पशुसंवर्धन हा बर्याच कुटुंबांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मुलं जन्मापासूनच गायींच्या, वासरांच्या, डुकरांच्या, शेळ्यामेंढ्यांच्या आसपास वावरत असतात. दोन तीन वर्षांची मुलं, आई-वडिलांबरोबर घरच्या फार्मवर जाऊन छोट्या छोट्या साधनांनी लुडबुड करत काम करायचा प्रयत्न करतात. दुसरी तिसरीपासूनच ही मुलं “4 H” सारख्या कार्यक्रमांमधे सहभागी होतात. पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली ती लहान वासरं, डुकरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या […]
अगदी छोट्या गावातील रेस्टॉरंट्स देखील घरगुती वळणाची. त्यांच्या ना झगमगत्या पाट्या, ना ड्राइव्ह थ्रू, ना चटपटीत वेशातली वेटर मंडळी. आतमधे बाकडी देखील साधी. भिंतीवर बहुदा गावाकडचं दृश्य दाखवणारं एखादं चित्र फ्रेम करून लावलेलं. कुठे घरगुती कलाकुसरीचे काही नमुने लावून ठेवलेले किंवा त्या गावचेच जुने ५०-१०० वर्षांपूर्वीचे काळे-पांढरे फोटो फ्रेम करून लावलेले. कुठे हरणांची शिंग भिंतीवर लावलेली […]
पालक देखील तेवढेच मनापासून शाळेत सहभागी होणारे. संध्याकाळचे जेवण पाच साडेपाच वाजताच आटोपून चर्चमधे choir प्रॅक्टीस (समूह – गान) करायला जाणे नित्याचेच. त्यामानाने शाळेतले कार्यक्रम कधीतरी होणारे, आणि म्हणून अधिक लोकप्रिय. आपल्या मुलांच्या शाळेतल्या बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे टीम्सना पालकांचा उदंड प्रतिसाद असतो. आसपासच्या गावातल्या इतर छोट्या शाळांच्या टीम्स आल्या की सामने मोठे अटीतटीचे होतात. […]
जितकं आत छोट्या गावांमधे जावं तितकं पुरुषांचं आणि स्त्रियांचं वर्तन आणि कामाची वाटणी अधिकाधिक काटेकोर होत जाते. मोठ्या शहरांमधल्या स्त्रिया अधिक स्वतंत्र, मोकळ्या ढाकळ्या आणि पुरुषांशी बरोबरी करणार्या असतात. त्यामानाने गावाकडच्या स्त्रिया थोड्या सौम्य आणि स्त्रियांची पारंपारिक कर्तव्ये पार पाडणार्या असतात. गावाकडे ‘घर हे स्त्रीचं साम्राज्य आणि घराबाहेर पुरुषाचा शब्द मोठा’ ही विभागणी अधिक प्रकर्षाने जाणवते. […]
नॉर्थईस्टमधे, पेनसिल्व्हेनियामधे, झाडांची काही कमतरता नाही. त्यामुळे लाकडाचं कुंपण बर्याच घरांभोवती आढळतं. झाडांचा जळाऊ लाकूड म्हणून देखील सर्रास उपयोग होतो. अनेक अद्ययावत घरांमधे दिवाणखान्यात किंवा फॅमिली रूम मधे एखादी शोभिवंत Fire place असणं हे मोठं कौतुकाचं आणि फॅशनेबल मानलं जातं. अर्थातच ही घरं अद्ययावत पद्धतीने हिवाळ्यात गरम केली जातात आणि Fire place चा उपयोग केवळ शोभेसाठी […]
अमेरिका हा बहुतांशी नागरी/शहरी लोकवस्तीचा देश आहे. एकूण ३० कोटी ८७ लाख (३०८ million ) लोकसंख्येपैकी २५ कोटी २५ लाख (८२%) लोक नगर/शहरवासी आहेत. कोलंबसची गलबतं जेंव्हा अमेरिकेच्या दक्षिणेला १४९२ साली येऊन थडकली, तेंव्हा अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन जमाती हजारो वर्षांपासूनच्या आपल्या परंपरा सांभाळत, आदिम जीवन प्रणालीनुसार जगत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात गुजराण करणार्या या स्वच्छंद पाखरांनी […]
अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील मनुष्यबळावर व पशुबळावर आधारलेल्या अमेरिकन शेतीचे विसाव्या शतकात झपाट्याने यांत्रिकीकरण होत गेले. शास्त्रीय संशोधनाची भक्कम बैठक, तंत्रविज्ञानातील प्रगती, रासायनिक खते, आधुनिक जंतुनाशके, सुधारित बियाणे, रोगराईचा समर्थपणे मुकाबला करू शकणार्या पिकांच्या नवीन प्रजाती, या सर्वांमुळे कृषी उत्पादनात नेत्रदीपक वाढ झाली. पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात देखील शास्त्रीय प्रगती व यांत्रिकीकरणामुळे फार्म्सना कारखान्यांचे रूप आले. कृषी तसेच […]
फार्म्सची घटत जाणारी संख्या हा कल (trend) दुसर्या महायुद्धापासून चालू आहे. परंतु फार्म्सच्या संख्येचा विचार करताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, या उद्योगात नव्याने प्रवेश करणार्या आणि या उद्योगातून बाहेर पडणार्या फार्म्समुळे, हा एक सतत प्रवाही असा आलेखपट झालेला आहे. २००२ – २००७ च्या दरम्यान जवळ जवळ ३००,००० फार्म्स बंद झाले, तर २२५,००० नवे फार्म्स सुरु […]