महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा
राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्या हिवाळ्यात टिकून राहते. […]