कॅशलेस संस्कृती स्वीकारलेला स्वीडन
स्वीडनमध्ये २२ एप्रिल २०१३ रोजी घडलेली एक गंमतीदार घटना सांगायला हवी. यादिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास स्कँडिनव्हिस्का एन्सकील्डा बँकेच्या स्टॉकहोम परिसरातल्या एका शाखेत एक दरोडेखोर शिरला. त्याने हातातले पिस्तूलवजा हत्यार उंचावले आणि बँक कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी धमकावले, पण स्वीडनमधील ती बँक शाखा पूर्णपणे कॅशलेस असल्याने तिथे लुटायला एक छदामही नव्हता. हे जेव्हा त्या दरोडेखोराला बँक अधिकाऱ्यांनी सांगितले, […]