नवीन लेखन...

पिझ्झा कटर कसे काम करतो?

एखाद्या महिलेचा अभियांत्रिकी दृष्टिकोन चांगला असेल तर तिच्याकडे तुम्हाला कलिंगड किंवा पपईसारखं मोठ्ठ फळ कापण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त लांब पाते असलेली सुरी आढळेल. तसंच त्या सुगृहिणीकडे तुम्हाला पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ कापण्यासाठी गोल पातं असलेली सुरी आढळेल… […]

आट्यापेक्षा मैदा अधिक लवचिक का?

तेव्हा मैदा आट्यापेक्षा अधिक लवचिक का असतो या प्रश्नाच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात घेऊया. पहिली म्हणजे आटा म्हणजे अख्या गव्हाचं पीठ! म्हणजे आटा तयार करतांना गव्हाच्या गुलाबी सालासकट त्याचं पीठ केलं जातं. मैदा करतांना गव्हाच्या आतल्या दाण्याचं पीठ करतात. […]

कोकण रेल्वेच्या बोगद्याची देखभाल

कोकण रेल्वेवर एकूण ९२ बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी ८३.६ किलोमीटर आहे. यातील नऊ बोगदे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. त्यासाठी खोदकाम करताना सर्व प्रकारचे दगड आणि माती आढळून आली. […]

सिलेंडरमधल्या गॅसचे स्वरूप काय असते?

आपण घरात स्वयंपाकघरात जो सिलिंडर असतो, त्यातल्या गॅसला म्हणतात एल. पी.जी. म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस! लिक्विफाईडचा अर्थ द्रव आणि गॅसचा अर्थ वायू ! लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे द्रव पेट्रोलियम वायू! […]

घरातली नळगळती थांबवा

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो. […]

रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि रोरो सेवा

मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात. […]

स्वयंपाकघराचा अभियांत्रिकीशी संबंध

नेमके कोणते पदार्थ एकमेकांपासुन वेगळे करायचे आहेत, त्या पदार्थाच्या कणाचा आकार कसा आणि केवढा आहे, त्यांनी एकमेकांपासून किती वेगाने आणि किती प्रमाणात वेगळं होणं गरजेचं आहे, या साऱ्याचं अवधान सांभाळत, त्यानुसार योग्य ते उपकरण वापरते, तीच आदर्श गृहिणी, गृहखात्याची चीफ इंजिनियर! […]

स्टेनलेस स्टील

स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते. […]

गंजण्यापासून संरक्षण

खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते. […]

1 2 3 4 5 6 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..