आपातीत गरजांची पुर्ती
आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा इतिहास थोडक्यात बघु या, कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘आज मिळाले ते आपले’ व ‘उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे, नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणीसाठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य चलन (पैसे) आले व व्यापाराला सुरवात झाली. […]