जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. […]