इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकोणीस
कुणाच्या अंगावर कुणाचे ओझे पोटामधील अवयव अत्यंत दाटीवाटीनी रहात असतात. जरा सुद्धा हलायला जागा नसते. एकाचा आधार दुसऱ्याला अश्या अवस्थेत, गाडी हलेल तशी हलत डुलत असतात. लोकलमधे तीन सीटच्या बाकड्यावर बसलो असताना, चौथा येऊन म्हणतो, “थोडा आगे…” तेव्हा आपल्याला काय वाटते. बरं बसला तो बसला, परत पेंगायला लागतो, पेंगतो तो पेंगतो, आणि वर घोरायला लागतो, त्याच्या […]