नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 2

रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे. उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची […]

जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 1

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी. नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे. आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल…… ……केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार […]

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तेरा

चर्चे पे चर्चा हो रही है, आयुर्वेदात सांगितलेला प्रमेह जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. खरंतर आधीच्या टीपांमधून हा विषय सांगून झाला आहे. काही गटामधे विचारलेल्या शंका आणि त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो. परत एकदा सांगतो. माझा कोणत्याही पॅथीशी वाद नाही. पण एवढं मात्र नक्की की आयुर्वेदात काय सांगितले आहे ते समजून तरी घेऊया. परत परत त्याच […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद. म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते. भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग अकरा

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7 फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर. नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दहा

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6 एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती. माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात……. इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल कालचा भाग 1 आजचा भाग 2 ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं…. “सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग नऊ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 5 लॅबच्या रिपोर्ट मधे आणखीन एक वाक्य असते. Results of test may vary from laboratory to laboratory and also in some parameters from time to time, for the same patient. इतकं खरं कोणच बोलत नसेल. आता हेच बघा ना, आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत, त्याचे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे रिपोर्टस् आले […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग आठ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4 आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते. आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय. म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सात

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3 लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते. Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis. त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, […]

1 28 29 30 31 32 54
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..