नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ४३ – चवदार आहार -भाग ४

आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले. बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ? होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना. म्हणजे […]

आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे. पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच. भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत. एकेकाळी भारत हाच […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग २

चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते. म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते. लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही. ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे […]

कॅन्सरच्या नवीन उपचार संशोधनांतील आयुर्वेदीय सिद्धांत !!

कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग १

शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही. मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत. डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. […]

संबंध ठेवायला अडचण येते?

ज्यांना आपला पुरुषी अहंकार कुरवाळत बसायची सवय असते; त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्यावाचून फार काही शिल्लक राहत नाही हे सत्य कायम लक्षात ठेवावे. […]

आहारातील बदल – शाकाहार भाग १५

जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही. जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये. जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये. आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ? एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १४

गहू खायचा नाहीतर तांदुळ ! एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो. गहू बंद केला तर कल्पना सुद्धा करवत नाही. मग डब्यात काय देणार ? यांना काय सांगायला जातेय, आम्हाला वेळच नाही, आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ? नुसतं हॅवाॅक आहे झालं !! सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १३

सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी. काय शाकाहार, काय मांसाहार काय असेल ते खाऊन घ्या गपचुप. शेवटी पोट भरण्याशी मतलब ना ! सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ? हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची […]

अभ्यंगस्नान

आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच ‘पहिली अंघोळ’ असंही म्हटलं जातं. ‘पहिली’ अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता ‘पहिली’. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!! अभ्यंग: संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे […]

1 40 41 42 43 44 54
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..