नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहार भाग १२

आता काय करू? कोकणात गहू वापरायचा नाही तर आता काय करू ? आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे आता काय करू ? गहू सोडता येणार नाही. आता काय करू ? सुखाची एवढी सवय झाली आहे आता काय करू? जसा प्रदेश, तसा आहार जसा आहार, तशी शरीरयष्टी जशी शरीरयष्टी, तसे काम जसे काम, तसा आहार. […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ११

जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १०

गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते. आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ? “मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ९

रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत. भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही. जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो. चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ८

शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता? भात किंवा भाकरी. प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते. ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो. बाजुला पोळी असते. आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. […]

थिंक ग्लोबली, इट लोकली….

  आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल. गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली. ती सुद्धा स्वतःच्या […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ७

जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ? असं चालत नाही किंवा पुरत नाही. जेवण्यातून समाधान मिळत असते. अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

हा खेळ आकड्यांचा पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे. आपण अगदी मुळापर्यंत जाऊ. अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, […]

सुक्या मेव्याचा राजा – बदाम

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो. औषधी गुणधर्म शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक […]

1 41 42 43 44 45 54
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..