नवीन लेखन...

वदनी कवल भाग १

वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होणे जाणिजे यज्ञकर्म हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया. मुखी घास घेता करावा विचार. कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझे हाती नित्य देशसेवा म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा असा परिवर्तित […]

आहाररहस्य १३

मना सत्य संकल्प….स्वास्थ्य संकल्प जीवी धरावा…. आधी एक ठरवूया, किती वर्ष जगायचंय ? आपली मानसिकताच इतकी बदलून गेली आहे, की कोणी शंभर वर्षासाठी जगायच्या शुभेच्छा दिल्या तर त्याही नको वाटतात. “पुरे झाले मिळाले तेवढे आयुष्य.” “कंटाळा आला.” “काय करायचे आहे जगून.” “नको रे बाबा, हे असलं जगणं.” “आता काऽही शिल्लक राहिले नाही” नकोत ती औषधे, नकोच […]

आहाररहस्य १२

आहार बदलला, संस्कार बदलले, परिणाम बदलले, आरोग्य बदलले. देशकाळानुसार आपला जो आहार होता, तो बदलला, त्याचे नियम बदलले, त्याचा पचनाचा एक विशिष्ट ठरलेला कार्यक्रम (आजच्या भाषेत प्रोग्राम) होता, तो बदलला, म्हणून पुढे आरोग्य बिघडले. म्हणजे, मी जे तेल लहानपणापासून खात आलोय ते मला कसे पचवायचे, ते माझ्या शरीराला माहीत असते. त्यासाठी विशिष्ट कष्ट घेण्याची शरीराला गरज […]

आहाररहस्य ११

आहाराचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्दात वर्णन केला आहे. दीपो भक्षयन्ते ध्वान्तं कज्जलंच प्रसूयते । यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायेते तादृशी प्रजा ।। ज्या प्रमाणे दिवा जळतो आणि काजळी तयार होते, तसा जसा आहार तशी परिणति होते. जसा दिवा तशी काजळी. म्हणजे जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. जर दिवा […]

आहाररहस्य १०

आहाराचा किती सूक्ष्म विचार उपनिषदांमधे केलाय. उपनिषदकार म्हणतात, जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी, प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण, आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन. याला पुरावा काय ? असा तिरकस प्रश्न विचारू नये. भारतीय दर्शन शास्त्रे, हीच पुरावा आहेत. हेच आप्तवचन आहे. आप्त […]

आहाररहस्य ९

आपण आहार का घेतो ? …..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी. कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ? …..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी. कशाला हवी धारणक्षमता ? ……निरोगी रहाण्यासाठी निरोगी जगायचे कशासाठी ? …..पुरूषार्थ पार पाडण्यासाठी पुरूषार्थ म्हणजे काय ? …..धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. ते मिळवण्यासाठी जगायचे. त्यासाठी काय करायला हवे ? …..चांगले आरोग्य मिळवायला […]

आहाररहस्य ८

All world is like a home. वसुधैव कुटुंबकम् ।। यालाच हे विश्वची माझे घर असं माऊलींनी म्हटलंय. जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला. या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल. ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती […]

साजूक तूप समज आणि गैरसमज

तूप खाल्ले की जाडी वाढते असा एक समज आपल्याकडे आहे. अतिशय योग्य आहे मात्र कोणते तूप? साजूक तूप कि वनस्पती तूप? दोन्ही तुपातील नेमका फरक समजून घेऊ. १)  वनस्पती तूप: हे तूप कसे तयार करतात याची माहिती अनेकांना नाही. वनस्पती तूप म्हणजे hydrogenated vegetable oil  हे कसे तयार करतात? निकेल अथवा प्लँटीनम धातूच्या संपर्कातून हायड्रोजन वायू खाद्य […]

आहारसार भाग १०

रासायनिक खते आणि विषारी फवारणी केलेला गहू, कोकणात तरी न धुता खाऊ नये. गावठी, देशी गाईच्या दुधाखेरीज अन्य जर्सी हाॅस्टीन एचेफ इ. जनावरांचे सरकारी भेसळ असलेले शिळे दूध पिऊ नये. किड पडून तयार झालेला, अनेक विरंजके वापरून बनवलेला साबुदाणा खाऊ नये. मूलतः भारतीय नसलेले, व्यसन होत जाणारे, पित्तासारखे व्याधी वाढवणारे, देशाचा पैसा देशाबाहेर पाठवणारे चहाकाॅफी सारखे […]

आहारसार भाग ९

अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ? तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग शरीराला जसं हवं तसं, शरीर ते शुद्धकरून घेतं. ही सर्व […]

1 47 48 49 50 51 54
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..