कॉलरा ऊर्फ पटकी
पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा मध्यावर कॉलरा डोके वर काढतो. गेल्या शतकात ७ वेळा पृथ्वीवर कॉलराने थैमान घातले. प्रत्येक खेपेला हे जिवाणू वेगवेगळ्या स्वरूपात आले. व्हिब्रियो कॉलरा नावाने ओळखले जाणारे हे जिवाणू एखाद्या स्वल्पविरामाप्रमाणे दिसतात. शेपट्यामुळे हे चपळ होतात. ऑक्सिजनविरहित वातावरणात वाढणारे व्हिब्रियो कॉलरा २० अंश सें.पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या मचूळ पाण्यात म्हणजे नदीमुखाशी व किनाऱ्यालगतच्या खाजणात जास्त […]