नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ७

असे का ? मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध. भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ६

शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ? मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते. न मांसभक्षणे दोषः न […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ५

मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे. आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी नवान्न पानं गुड वैकृतम् च प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !! ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस. ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ४

माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून. शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ३

दुसऱ्याच्या ताटात बघण्याअगोदर स्वतःचे ताट बघावे, या अर्थाची एक म्हण आहे. म्हणजे दुसरा काय करतोय, कसं करतोय, कशासाठी करतोय, हे पहाण्यापेक्षा मला कशाची गरज आहे ते पहावे, म्हणजे जीवनातील बहुतेक सर्व दुःखे नाहिशी होतील असे वाटते. अगदी तिच गोष्ट जेवणाची सुद्धा ! दुसरा काय खातोय, कशासाठी खातोय, का खातोय, हे खरंतर बघूच नये. कदाचित म्हणूनच माझी […]

जागर स्त्री आरोग्याचा

‘भारतीय संस्कृती आणि स्त्रिया’ असा विषय चर्चेला आला की स्वाभाविकपणे सतीप्रथा, विधवा पुनर्विवाह बंदी इथपासून ते शिक्षणाचा अभाव आणि ‘चूल आणि मूल’ इतकेच बंदिस्त आयुष्य अशा गोष्टी हमखास वाचायला, ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात तसेच आहे का? याचा पूर्वग्रहरहित विचार तथाकथित बुद्धिवादी लोक मुळीच करत नाहीत. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी ते अगदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माँसाहेब, महाराणी […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग २

माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच ” माया ” असे म्हणतात वाटतं. एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख. असो. मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग १

शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते. या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे. काही जण समजत होते, माणूस शाकाहारी. काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. […]

सकाळी फिरायला जाताना ज्यूस घेणे आरोग्यवर्धक असतं?

सध्या तर फळभाज्यांसह विविध गोष्टींचे रस भल्या पहाटे पिण्याची चढाओढच अनेक स्त्री-पुरुषांमध्ये दिसते. जॉगिंग ट्रॅक्सवर तर भल्यासकाळी त्या रसठेल्यांसमोर रांगा लागतात. कुणी दुधीचा रस रोज पितो, तर कुणी कढीपत्त्याचा, कुणी गव्हाचा तृणरस तर कुणी कारल्याचा, कोरफड, काकडी, गाजराचा किंवा कुणी या सगळ्याचा मिक्स रस रोज नियमित, न चुकता सेवन करतात. एकवेळ व्यायाम राहिला तर चालेल; पण […]

नवस आरोग्याचा… वसा वजन कमी करण्याचा

डॉ. कविता पवन लड्डा, लातूर, महाराष्ट्र. यांचे द्वारे महत्वपुर्ण माहीती खास तुमच्यासाठी. शुक्रवारी श्राध्द पक्ष संपून एक तारखेपासून घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशात आपापल्या रितीप्रमाणे मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेऊ या , यंदा […]

1 134 135 136 137 138 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..