चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !
प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’
महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.
” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |
अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )
प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल. […]