नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

मुलांमधील कर्करोग

निष्पाप निरागस कोणतेही व्यसन नसणारे बालक व किशोरवयीन मुलांना कर्करोग का व्हावा, त्यांना कोणते कर्करोग होतात असे प्रश्न मनात येतात. बहुधा लहान मुलांना रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्याचा न्युरोब्लॉस्टोमा हा मेंदूचा विल्म ट्युमर हा किडनीचा, अस्थित होणारा ऑस्टिओब्लास्टोमा हा हाडाचा, लुकिमिया आमि लिंफोमा हा लिंफ उतीतील पेशींचा कर्करोग होतो. यातील बरेच कर्करोग पेशीतील रंगसूत्रात बदल झाल्यामुळे होतात. गर्भाशयात […]

कर्करोगाचा प्रतिबंध

बहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते. […]

कर्करोगाच्या उपचार पद्धती

कर्करोगावर प्रमुख उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गी पदार्थांचा, रासायनिक पदार्थांचा वापर व ल्युकिमिया या रोगात होणारे अस्थिमज्जारोपण. शंभर वर्षांपूर्वी त्वचेवरील चामखीळ नाहिशी करण्याकरिता क्ष किरणांचा वापर झला होता. नंतरच्या काळात रेडियम या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लागला. रेडियमच्या संपर्काने शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो हे लक्षात आल्यावर हे किरणोत्सर्गी पदार्थ कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येऊ लागले व […]

विवाहपूर्व तयारी

भारतीय कायद्याप्रमाणे मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे आहे. लग्नाच्या वेळी वधु-वर सुदृढ असावेत. विशेषतः मुलीच्या प्रकृतीची जास्त काळजी/ लग्नानंतर मातृत्व येणार- त्यासाठी मुलीची, शारीरिक अवस्था चांगली असणे जरुरीचे असते. गर्भारपणामध्ये मुलीच्या शरीरात पुष्कळ बदल होतात. श्वसनसंस्था, रुधिराभिसरण, पचनसंस्था इत्यादी संस्थांना जास्त काम करावे लागते. मातेच्या पोटात बाळ वाढते ते आईकडून होणाऱ्या अन्नाच्या […]

वार्धक्यातील दातांची काळजी : कवळी

नैसर्गिक दात चांगल्या स्थितीत ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची “संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दातांच्या काही रोगांमुळे शरीरात सेप्टिक फोकस होण्याचा संभव आहे. या कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांना थोडे किंवा सर्व दात काढून घ्यावे लागतात. दात काढल्यावर दुसरे कृत्रीम दात बसविणे जरूर आहे. असे न केल्यास जबड्याची हाडे झिजून जातात व अन्नपचनावर व शब्दोच्चारावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षात कृत्रीम […]

बस्ती कर्म

आयुर्वेदानुसार वातज विकारांसाठी ‘बस्ती’ हे शोधनकर्म परमश्रेष्ठ मानलेले आहे. वाताचे मुख्य स्थान ‘पक्वाशय’ आतडे असून, त्या ठिकाणाचा वातदोष जिंकल्यास शरीरातील इतर वातविकारांवर नियंत्रण ठेवता येते. बस्तीयोग्य विकार- संधिवात, अंगदुखी, हृदयविकार, स्थुलता, कृशता, अर्धांग वायू (लकवा), कंपवात पारकिन्सन्स डिसीज, गर्भाशयाचे विकार इत्यादि. बस्तीचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु मुख्यतः दोन प्रकारचे बस्ती सध्या व्याधी नष्ट करण्याकरिता वापरले […]

अपघाताने खुब्याच्या सांध्याला होणारी इजा

हल्ली वाढलेल्या मोटर अपघातांमुळे या सांध्याला होणाऱ्या इजा वाढल्या आहेत. यात सांधा निखळणे, सांध्यातील उखळीला अस्थिभंग होणे, तसेच फीमरच्या डोक्याला व त्याच्याखाली असलेल्या मानेजवळ (नेक ऑफ फीमर) अस्थिभंग होणे आदी गोष्टी होऊ शकतात. खुब्याचा सांधा बाहेर येणे किंवा निखळणे हे मोठ्या मारानेच होऊ शकते. असे झाल्यास अगदी लवकरात लवकर तो सांधा उखळीत बसविणे अत्यावश्यक असते. नाहीतर […]

बालपणातील खुब्याच्या सांध्यांचे विकार

जन्मतःच काही मुले खुब्यातील सांधा निखळलेल्या अवस्थेत जन्मतात. याची कारणे अनेक आहेत; परंतु पायाळू जन्मलेल्या मुलांमध्ये असा प्रकार असण्याची शक्यता अधिक असते. मुख्यत्वे उखळ व्यवस्थित तयार न झाल्याने असा प्रकार संभवतो. याचे निदान अनुभवी डॉक्टरच करतात. कारण क्ष-किरणांद्वारे नवजात अर्भकामध्ये याचे निदान करता येत नाही. त्वरित योग्य निदान आणि उपचार सुरू करावे लागतात. पूर्वी या सांध्याला […]

ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना

आवाजाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपाय योजल्यास शारीरिक परिणामांचे धोके टाळता येतात. ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रांवर कंपने रोखणे, निर्माण होणाऱ्या ध्वनीचे शोषण करणारे उपाय योजावेत. ध्वनीनिर्मिती कमी असणारी यंत्रणाच खरेदी करावी. कारखान्यातील यंत्रे ध्वनीरोधक लाद्यांचा पाया वापरून व कंपरोधक स्प्रिंग वापरून बनवतात. जुन्या यंत्रांवर ग्लासवूलचे जाड आवरण टाकून ध्वनी प्रसरण कमी होते. यावर जर डांबराचे […]

अंडाशयात साठलेल्या अनेक गाठींमुळे उद्भवणाऱ्या समस्या (उत्तरार्ध)

पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिण्ड्रोम (पीसीओएस) या आजाराची लक्षणे: १) अनियमित पाळी येणे व अति रक्तस्त्राव होणे. २) चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरूम येणे. ३) नको त्या ठिकाणी केसांची अधिक वाढ होणे (चेहऱ्यावर, छाती/ ओटी-पोटावर इत्यादी) केसांची अधिक वाढ होते. ४) लठ्ठपणा. ५) सोनोग्राफी तपासणी केल्यास | बीजांडाकोशात गाठीचा समूह दिसतो (पॉलिसिस्टीक ओव्हरी). ६) रक्तातील संप्रेरकाच्या प्रमाणात बदल होणे. […]

1 13 14 15 16 17 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..