नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

‘श्रेयसी प्रजा’ काळाची गरज !

सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच. ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते. […]

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन

आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणं ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांग परिपूर्ण असणे गरजेचे आहे. सुप्रजनन हा आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे. दर […]

वर्षा ऋतु – गर्भसंस्कार…. एक दृष्टीकोन

वर्षा ऋतु- निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:| मास- श्रावण, भाद्रपद इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर रास- सिंह ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे. “आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति | वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे || सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च | भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा || वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु | भजेत् […]

न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान आणि त्यांचा खेळातील परफॉर्मन्स ह्याचा काही संबंध आहे का ह्या विषयी मात्र खेळाडूंमधे स्पष्टता नव्हती असे निदर्शनास आले. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान जितके चांगले तितका त्यांचा न्यूट्रीशन चॉईस चांगला असू शकतो असे ही आढळले आहे. चांगल्या न्यूट्रीशन चॉईस चा फायदा त्यांना त्यांचा फिजीकल फिटनेस मधील […]

गरोदर स्त्रियांसाठी आहार

कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो. आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु […]

केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. […]

लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

लेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे (लेड) गेल्यावर त्याचे खूप घातक परिणाम होतात हे आपल्या देशातील ‘नॅशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग’ या संस्थेनं सिद्ध केलं आहे. लेडचे रक्तातील प्रमाण किती असावे, किती प्रमाणात वाढल्यास ते घातक समजावे, लेड रक्तात कोणत्या मार्गाने येते,  रक्तातील वाढलेल्या लेडच्या प्रमाणामुळे काय लक्षणे होतात, ते कसे टाळता येईल, वाढलेले प्रमाण कोणत्या औषधाने कमी […]

स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर मात्र शरीरात ती सॅच्युरेटेङ फॅट सारखी वागते, आणि म्हणूनच ह्याचा सेवनाने LDL म्हणजे वाईट कोलेस्टरॉल वाढते. ट्रान्स फॅट ही ट्रान्स फॅटी अॅसिड म्हणून ही ओळखली जाते. ही दोन स्वरूपात आढळते. प्राणीजन्य पदार्थातून जसे की जास्त चरबी असलेले मटण, बीफ, कोकराचे मटण, तसेच पूर्ण फॅट असलेले दूध […]

ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही

तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते. विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके […]

1 148 149 150 151 152 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..