नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर मात्र शरीरात ती सॅच्युरेटेङ फॅट सारखी वागते, आणि म्हणूनच ह्याचा सेवनाने LDL म्हणजे वाईट कोलेस्टरॉल वाढते. ट्रान्स फॅट ही ट्रान्स फॅटी अॅसिड म्हणून ही ओळखली जाते. ही दोन स्वरूपात आढळते. प्राणीजन्य पदार्थातून जसे की जास्त चरबी असलेले मटण, बीफ, कोकराचे मटण, तसेच पूर्ण फॅट असलेले दूध […]

ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही

तुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते. विशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके […]

किडनी स्टोन्स (Kidney stones) आपण टाळू शकतो का?

किडनी स्टोन्स म्हणजे काय? लघवी मधील काही घटकांपासून कठीण कण जमा व्हायला लागतात. त्यांचे एकावर एक थर जमा होऊन मूतखडा तयार होऊ लागतात. ते विविध आकारात आढळतात, धान्या एवढा बारिक तर कधी मोत्या एवढा मोठ्ठा सुद्धा असू शकतो. बर्याच जणांत जास्त त्रास न होता हे स्टोन्स शरिराच्या बाहेर टाकले जातात पण काही वेळेस असे होताना दिसत […]

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५० % लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करताही बरे होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात, आयुष्यभर सतावतात. सांधेदुखीची सविस्तर माहिती साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल…

२१ जून २०१५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. योग हे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच फिटनेस सिक्रेट नसून केंद्रीय मंत्रीमंडळानेही त्याची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच की काय, केंद्रीय मंत्रीही आपल्या घरी योगाद्वारे फिटनेसचा फॉर्म्यूला वापरत असावेत. नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग दिनाबद्दल जनतेला आवाहन केले. त्यावेळी त्यांनी स्वतः घरी योगा करत […]

सुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार

सध्या बातम्यात काही अन्नपदार्थ सुरक्षित आहेत कि नाहीत ह्यावर बरीच चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते. जणु काही वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनला (WHO) स्वप्न पडले म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी आपण “Food Safety: Food from farm to plate make it safe” अशा स्लोगनेच आपण 7 एप्रिल 2015 रोजी जागतिक आरोग्य दिन […]

कॅलरीज रिसट्रीकशन फायद्याचे की नुकसानीचे?

जगात सगळीकडे बदलाचे वारे वाहताना दिसतात. खेडोपाडी वागण्या बोलण्यात अगदी खाण्या पिण्यातही शहरीकरणाचा प्रभाव होताना दिसत आहे. सध्या लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि साखरेचे पदार्थ, मीठ/मीठाचे पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो तसेच फळ व भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. ह्या सर्वांनाचा परिणाम म्हणून आहारातून तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी होताना दिसतोय. ह्या सर्व […]

कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहाराच्या सहायाने कमी होऊ शकेल का?

जगात आढळणार्‍या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल. […]

मुलगा की मुलगी होण्यास जबाबदार कोण?

आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत महासत्ता होण्याच्या प्रयत्नात असतांना भारतातील काही नागरिकांच्या मनातून जुने, बुरसटलेले विचार आणि अंधश्रद्धा काहीकेल्या जाता जात नाहीत. काहींना असे वाटते मुलगी म्हणजे डोक्याला विनाकारण ताप. तिची […]

बाहेर खाणं रक्तदाबासाठी चांगले की वाईट?

2006 सालापासून 17 में हा जागतिक रक्तदाब दिन (World Hypertension Day) म्हणून साजरा केला जातो. 2013 ते 2018 ह्या 5 वर्षांसाठी “Know Your Numbers” ही थीम राबविण्यात येत आहे. ह्याचा उद्देश आहे कि जगातील जास्तीतजास्त लोकांमध्ये हाइपरटेंशन बदल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून हा जागतिक दिवस साजरा केला जातो. हाइपरटेंशन हा एक सायलेंट किलर […]

1 149 150 151 152 153 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..