नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग २)

डॉक्टरांना विचारावे. सोडियम असलेली औषधे किंवा खाद्यपदार्थ यामुळे रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच ॲटासीड, कॅनमधील खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, पापड-लोणची यांचे सेवन मर्यादित ठेवा. उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळ घ्यायची असल्यामुळे त्यांचे काही साइड इफेक्टस् दिसू शकतात. उदा. झोपून उठताना तोल जाणे, तोंड शुष्क होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, झोप न लागणे, मलावरोध इ. अर्थात हे साइड इफेक्टस् दिसतीलच असे […]

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग १)

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही. काही रुग्णांमध्ये […]

आनुवंशशास्त्र (भाग ३)

नात्यातल्या नात्यात लग्न झाल्यास आनुवंशिक आजार उद्भवतात असे आढळते. नात्यातील लग्नात, उदाहरणार्थ आतेभाऊ- मामेबहीण वा मामा- भाची इ., नवरा व बायको दोघांचे आजोबा/ पणजोबा इ.एकच असल्याने त्यांच्यातील सदोष जनुके दोघांमध्ये येण्याची, म्हणजेच दोघेही ‘कॅरिअर’ असण्याची शक्यता वाढते. कोणीही कधीही गर्भार राहिलं, तर नवीन येणाऱ्या बाळात रचनेचा वा कार्याचा काही ना काही दोष आढळण्याची एरवी ३-५ टक्के […]

अनुवंशशास्त्र (भाग २)

घराण्यात कुठलाच आजार नसताना अचानक एका बाळात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार उद्भवू शकतो का? हा प्रश्न मनात येतो. रंगसूत्रांत वा गुणसूत्रांत गर्भ वाढत असताना नव्याने काही चुका/ दोष निर्माण होऊ शकतात. त्यातून वाढणाऱ्या गर्भात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार दिसतो, मात्र तो आई-वडिलांकडून आलेला नसतो. अनेकदा जनुकांच्या दोन प्रतींमधली एक प्रत काम करीत नसते, मात्र दुसरी प्रत आवश्यक ते […]

अनुवंशशास्त्र (भाग १)

आजच्या पद्धतीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही ‘स्पेशलायझेशन’ विशेष प्रावीण्य असणारे तज्ज्ञ आपल्याला दिसतात. स्त्री रोगतज्ज्ञ स्त्रियांचे आजार, प्रसूतिसंबंधी बाबी बघतात तर नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्यांचे विकार बघतात. अस्थिरोग, बालरोग, न्यूरॉलॉजी वगैरे विशेष शाखांबद्दल आपण ऐकतो, मात्र आनुवंशशास्त्रतज्ज्ञ किंवा जेनेटिसिस्ट हे नेमक्या कुठल्या प्रकारच्या आजारांचे, कुठल्या अवयवांचे डॉक्टर, हे ध्यानात येत नाही. हे नावच इतकं मोठं आणि उच्चारायला कठीण वाटतं, की […]

झिजेचा संधिवात (ऑस्टिओआथ्रायटीस)

आपल्या घरातील, नात्यातील किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यातील वयस्करांकडून एक तक्रार नेहमी ऐकू येते- गुडघेदुखीची! ज्येष्ठांच्या या समान तक्रारीला कारणीभूत असतो झिजेचा संधिवात. ही तक्रार का उद्भवते? आपल्या गुडघ्यांमध्ये दोन हाडांच्या मध्ये कूर्चा (गादी) असते. वयोमानानुसार किंवा वजनानुसार ही गादी घासली जाते. जेव्हा आपल्या गुडघ्यांवर वजन किंवा जोर पडतो तेव्हा ही गादी घासली गेल्यामुळे दोन्ही हाडेदेखील एकमेकांवर घासली जातात. […]

कोपराजवळील काही महत्त्वाचे आजार

अगदी लहानपणी १ ते ५ वर्षांपर्यंत मुलाचा हात सहजगत्या अधिक जोरात ओढला गेला तर मुले रडू लागतात व संपूर्ण बाहू हलविणे बंद करतात. अशा वेळी काय करावे हे आई-वडिलांना कळत नाही याला खेचलेला कोपराचा सांधा असे म्हणतात. लहान वयात पाचसाडेपाच वर्षांपर्यंत रेडियस या हाडाचे अस्थिकरण झालेले नसते. त्यामुळे वर्तुळाकार हेडऑर्बिक्युलर लिगामॅण्टमधून सहजपणे बाहेर येऊ शकते. त्यामुळे […]

लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग

कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते. क्ष-किरणाने याचे निदान होते; परंतु त्याच वेळी आसपासच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली असल्यास ते पडताळून पाहावे लागते. पूर्वी या अस्थिभंगाची योग्य उपाययोजना न झाल्याने हात कोपराजवळ वाकडा वाढत असे. कोपराला मालिश केल्याने जरी […]

कोपराचा सांधा

या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे. हे ढोलक्याकृती मुसळ अलना […]

तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला […]

1 14 15 16 17 18 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..