मनगटाजवळील नस दबणे
हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात. काही कारणाने या बोगद्याची खोली कमी झाली तर ही मीडियन चेता दाबली जाते […]