मलेरिया
मलेरिया हा प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाचा उल्लेख इजिप्तच्या फॉरोंमध्ये व चरक संहितेतही सापडतो. आधुनिक युगात सर रोनॉड रॉस या ब्रिटिश भारतीय सेनेच्या डॉक्टांनी मलेरिया डासांद्वारे पसरतो हे सिद्ध केले. व्हायव्याक्स, फॉलसिपॉरम, ओव्हेल व मलेरिए हे प्लासमोडियम प्रजातीचे चार मुख्य प्रकार आहेत. भारतात व्हायव्याक्स व फॉलसिपॉरम सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात. प्लासमोडियम […]