योगासने व प्राणायाम
अनेक ढोबळ मानाने त्यांचे पाश्चात्य व पौर्वात्य असे दोन भाग पाडता येतील. तेव्हा अगोदर व्यायाम म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. व्यायाम म्हणजे शरीराची व शरीरातील प्राणशक्तीची ओढाताण करणे किंवा शरीर शक्तीशी झुंज देणे. आयाम म्हणजे शरीर शक्ती व प्राण शक्ती यांना योग्य तऱ्हेने व योग्य दिशेने आणणे, विस्तृत करणे, संचित करणे अथवा थोपवून धरणे, बांध घालणे आणि त्याचा निरोध करणे. […]