नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

झोप का हवी

झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ५ – कोकम

कोकण हा महाराष्ट्रातील अत्यंत रमणीय सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. या प्रदेशात आंबा, फणस काजू यासारखे बहुगुणी फळे आहेत. पण ह्या फळामध्ये गेली एक दोन दशके दुर्लक्षित राहिलेले बहुगुणी औषधी फळ आहे. त्याचो आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचे नाव कोकम किंवा रातांबा आहे. उन्हाळ्यात कोकणात आंबा, फणस व काजू सारखी अतिरथी […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ४ – डाळिंब

डाळिंबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळिंबाचे उगमस्‍थान इराण असून इ.स. 2000 वर्षापासून डाळिंबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्‍पेन, इजिप्‍त, अफगाणिस्‍थान, मोराक्‍को, बलूचीस्‍थान, पाकीस्‍तान, इराक, ब्रम्‍हदेश चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्‍ये लागवड केली जाते. भारतात डाळिंब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राचा देशाच्या उत्पादनामध्ये ६६.९० टक्के वाटा आहे. […]

मेंदूसाठी मूलतत्त्वे !

विचार आणि वर्तनाचे (त्यातून कृतीचे) मेंदू हे उगमस्थान असते. त्यावर आपले “होणे” अवलंबून असते. गैरवापर केला तर आपण वेगळे होतो आणि सदुपयोग केला तर वेगळे असतो. आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मेंदूच्या सूचनेबरहुकूम होत असतात. याहीपलीकडे एक कार्य असते- प्रतिक्षिप्त क्रियेचे! […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ३ – पेरू

तसे पाहायला गेले तर पेरूंशी आपली मैत्री लहानपणा पासूनची आहे. मग ती पोपट व पेरूची फोड असो किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत बालपणी शाळेत मित्राबरोबर खाल्लेल्या पेरूच्या आठवणी असोत. पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. 
अशा या पेरूबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. […]

मेंदूवर क्ष-किरण

मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो. […]

स्वतःला घडविताना !

प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या…. […]

ताण – तणावांचे विषाणू

ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

सवयींचे व्याकरण !

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही. […]

मेडिटेशन गरजेकडून व्यवसायकडे ?

विषय विचित्र म्हणा , गरजेचं काहीही म्हणा! परंतु आज जगभर या व्यवसायात करोडो डॉलरची उलाढाल होते हे मान्यच करावे लागेल. फार पूर्वी फ्राईड ने संगितले होते २०२१ किंवा त्यानंतरचे शतक मानसोपचार तज्ञांचे असणार आहे . आज ती वस्तूस्थती निर्माण झाली आहे कारण कोरोनाच्या काळात एक तर सवांद तुटलेला आहे आणि काहींच्या डोक्यात पुढे काय ? हा यक्षप्रश्न निर्माण झाला असणारच ह्यात शंका नाही. […]

1 28 29 30 31 32 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..