मशरुम खाण्याचे फायदे काय आहेत
मशरुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मशरुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. मशरुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आपल्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतो. […]