मेथी
अगदी हिमालय, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मेथी सर्वत्र आढळते. तसेच ते श्रीलंकेपासून ते मध्य आशिया खंड, युरोप आणि अनेक आफ्रिकन खंडात हे प्रचलित आहे. आयुर्वेदात जरी हे मान्य केले तरी आज अनेक देशात मेथीचे बाबतीत संशोधन चालूच आहे. तरीही आयुर्वेदात मेथीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मेथीमुळे मधुमेह व रक्तदाब यांना अटकाव होतो, असा शोध आयुर्वेदात लावला होता. तसेच मेथी हे नुसते भाजी नसून ते अत्यंत महत्त्वाचे औषधही आहे. […]