नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) – ‘हार्ट-लंग’ मशीनचे जनक

‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्‍युनिअर) यांच्‍याकडे या प्रणालीच्‍या विकासाचे जनकत्‍व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या सहाय्याने शस्‍त्रक्रिया केली. यशस्‍वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया मानली जाते. […]

टाळ्या वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

लहानपणी मुलांना प्रथम आपण टाळ्या वाजवायला शिकवतो. टाळ्या वाजवताना लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असतो. लहानपणी शिकलेली टाळ्या वाजवण्याची सवय आपल्याला आजन्म उपयोगी पडते. कारण कुठल्याही चांगल्या प्रसंगी आपण आनंदाने टाळ्या वाजवतो. […]

जाणून घ्या तांब्याचे आरोग्यदायी फायदे

आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते. […]

मांसाहार आणि आयुर्वेद …..

आयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात … […]

सैनिकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन

दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात बॉम्‍बस्‍फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्‍यातच त्‍यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्‍या हृदयावर शस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे प्राण वाचविण्‍यात यश मिळविले. त्‍यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्‍त्रक्रिया केल्‍या. यातील सर्वात उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ह्या सर्व १३० शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍या. यामुळे त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. […]

सौंदर्यवर्धक संत्री साल

हल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते.यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन, ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते.बाजारातबरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो . […]

आरोग्यपूर्ण आयुर्वेदिक चहा…अर्थात भारतीय “कषाय”

सकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया. […]

पंचकर्म: आयुर्वेदाची अनमोल देणगी !

आजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते. […]

कुशल शल्‍यचिकित्‍सक डॉ. डेंटन कूली

कूली यांच्‍याकडे १०० हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया सर्वप्रथम करण्‍याचा मान जातो. कूली निष्‍णात शल्‍यविशारद होतेच. वयाच्‍या पन्नाशीतच त्‍यांनी ५००० पेक्षा जास्‍त हृदयशस्‍त्रक्रिया व १७ हृदयप्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केल्‍या होत्‍या. त्‍यांनी विपुल लिखाणही केले. त्‍यांची १२ पुस्‍तके व १४०० पेक्षा जास्‍त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. […]

प्रतिभावंत हृदयशल्‍यविशारद डॉ. मायकेल डिबाकी

डिबाकी कायमच प्रसिद्धीच्‍या झोतात राहिले. त्‍यांच्‍या ७० वर्षांच्‍या अत्‍यंत यशस्‍वी वैद्यकीय कारकीर्दीत साठ हजारांपेक्षा जास्‍त हृदय-शस्‍त्रक्रिया डिबाकी व त्‍यांच्‍या सहकार्‍यांनी डिबाकींच्‍या अध्‍यक्षेतखाली यशस्‍वी केल्‍या. यामध्‍ये अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्‍सन, रिचर्ड निक्‍सन, ड्यूक ऑफ विंडसर, जॉर्डनचे राजे हुसेन, रशियाचे अध्‍यक्ष बोरिस येल्त्सिन, इराणचे शहा तसेच मार्लिन डिट्रिच यांच्‍यासारखे हॉलिवूड मधील तारे, तारका यांच्यावरील हृदय-शस्‍त्रक्रियांचा समावेश होता. […]

1 39 40 41 42 43 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..