नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

औदुंबर/उदुंबर/उंबर

श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ गोल असून २.५-५ सेंमी व्यास असलेले असते.फळे गुच्छात उगवतात.फळात लहान किडे असतात.खोडाचा छेद […]

वासा/अडुळसा

१-३ मीटर उंचीचे अडुळशाचे झुपकेदार क्षुप असते.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब व काळपट हिरवी,गुळगुळीत व भालाकार असतात.फुले २-५-८ सेंमी लांब मंजिरी स्वरूपात असतात.पाकळ्यांची रचना हि सिंहाच्या जबड्या प्रमाणे असते.फळ २ सेंमी लांब लवयुक्त व शेंगेच्या स्वरूपात असते. अडुळशाचे उपयुक्तांग आहे मुळ,पाने,फुले.अडुळसा चवीला कडू,तुरट असून थंड गुंणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर आहे. चला […]

सप्तपर्ण/सातविण

हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते […]

जांभूळ/जम्बू

सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे फळ,त्वचा,पाने व बी.जांभुळ चवीला तुरट,गोड,आंबट असते.गुणाने थंड व जड व रूक्ष असते.जांभुळ कफ पित्तनाशक व […]

अशोक

हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात. अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व […]

मुळव्याध – अवघड जागेचे दुखणे

मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराद्वारे बाहेर फेकला जातो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्राँग औषधे घेणे, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. […]

शिरीष

ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात. ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न […]

थायरॉइड नियंत्रणात येतो

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख. […]

सेल्फीचा रोग

आजच्या तरुण पिढीला सेल्फीचा जणू रोगच जडला आहे। आणि हा आजार presences of mind घालवण्यापासून ते मृत्यूपर्यंत कुठलेही फळ देऊ शकतो। […]

गॅसेस (गुबारा) आणि त्यावरील उपाय

बर्‍याच  लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते. वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया. बध्दकोष्ठता असल्यावर मोठया आतडयात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा […]

1 51 52 53 54 55 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..