तेजोवलय (Aura) भाग २
तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते. […]