नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

विडा घ्या हो नारायणा – भाग ७

पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग ६

पानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग ५ 

चुन्याबरोबर सहजपणे मिसळला जाणारा आणि आपला रंग चुन्याला देणारा कात हे आयुर्वेदातील एक अप्रतिम “लाईफसेव्हींग ड्रग” आहे. खैराच्या झाडाच्या जून सालींचा काढा करून खैराच्याच लाकडाने ढवळत त्या काढ्याचा केलेला खवा म्हणजे कात होय. पूर्णतः नैसर्गिक. उत्तम रक्तस्तंभक. रक्तशुद्धी करणारा. अनेक त्वचारोगांवर वापरला जाणारा हा कात. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग ४

पान जरूर खावे. आजचा तंबाखू सोडला तर पान हे व्यसन नक्कीच नाही. त्यातील घटक किती प्रमाणात असावेत अशी काही लिखित संहिता नाही. जसं आजकाल सांगितले जाते, दररोज तांदुळ अमुक ग्रॅम, अमुक ग्रॅम वजनाची भाजी भाकरी, एवढे मिली आमटी, एवढी मिग्रॅम चटणी. वगैरे. आपल्या इथे प्रत्येकाचे नियम वेगळे….. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग ३

पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग २

विडा हा एवढा औषधी गुणधर्माचा आहे, की हा जर कोणी खात असेल तर त्याला अन्य कोणते रोग होण्याचा चान्सच नाही. वेगळे व्हिटामिन्स नकोत, कॅल्शियम नको, पाचक नको, वेगळे रक्तशोधक नको, वेगळे अस्थिपोषक नको, वेगळ्या औषधाची गरजच नाही. विडा हेच स्वयम एक औषध आहे. फक्त त्याची खाण्याची एक पद्धत आहे. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग १

देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एक्याऐशी

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 38 नैवेद्यम् समर्पयामी – भाग बारा अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।। अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा. अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।। अमृतोपस्तरणमसी…पाश्य मौनी । …..जलंस्पृष्ट्वा यथेष्टं […]

1 66 67 68 69 70 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..