कबुतरखान्यांच्या निमित्ताने…
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या कबुतरांची गणना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करणार आहे. पहिल्या टप्प्यात कबुतरांची संख्या मोजली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कबुतरखाने, कबुतरांचे राहणीमान, त्याचे लोकांवरील परिणाम आणि तिसऱ्या टप्प्यात विविध डॉक्टरांशी चर्चा करून, कबुतरांचे आरोग्य आणि कबुतरांचे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयी माहिती मिळविली जाईल. मुंबईत कबुतरांसाठी दाण्यांची, राहण्याची आणि सुरक्षेची सोय सहज होते. अशा अनेक कारणांमुळे मुंबईत कबुतरांची संख्या येत्या काळात अधिक वाढणार आहे, असे बीएनएचएसचे म्हणणे आहे. […]