आवळा
आवळा हे अस्सल भारतीय फळ आहे. आवळ्याला संस्कृतात आमलकी असे म्हणतात. आवळ्याचे झाड हजारो वर्षापासून असावे. स्कंद पुराणात अथवा गरुड पुराणात याची सर्व माहिती मिळते. पूर्वीच्या काळी घराच्या दक्षिणेला आवळा लावून त्याची पूजा करीत असत. कार्तिक महिन्यात आवळी भोजनाचा कार्यक्रम असे व ते आवळ्याच्या शेजारीच भोजन करीत असत. […]