नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?…..हा घ्या उपाय!! तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर ‘स्पीच थेरपी’चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक ‘अखेरची आशा’ म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात ‘वाक्शुद्धिकर’ म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास […]

कुठलंही काम, तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही

तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेवीस

लंबी सफर का घोडा शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम ! कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर […]

जागतिक आरोग्य दिन

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच […]

आयुर्वेदिक डाळिंब

डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे. डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे. १. रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे […]

आजचा विषय नीरा

नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते. ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास […]

खोकल्याचे विविध प्रकार

प्रथम खोकल्याचे औषध घेण्यापुर्वी आपल्याला नेमका कोणत्या प्रकारचा खोकला झाला आहे हे समजायला हव! सर्दी खोकला ही जुळी भावंड असल्यासारखे असतात. सर्दी झाली की काही दिवसांनी खोकला होतोच. विविधप्रकारचे धुर- धुळ वा वास अत्तर रसायनांचे वास उदा. बॅगाॅन स्प्रे वगैरे, आईस्क्रिम, थंड पाणी, शीतपेय , सरबत यांच्यामुळे खोकला होतो. थंड वातावरणात रहाणे किंवा जाण एयरकंडीशनर चा […]

वेदांतील प्राण्यांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे

वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत. वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात. वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची […]

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं……. 1) जॉब हेक्टिक आहे ( कुणाचा नसतो ?) 2) वेळच मिळत नाही ( सर्वांनाच 24 तास मिळतात !) 3) खूप काम असते ( रिकामटेकडा कोण असतो ?) 4) अभ्यास खूप असतो कॉलेजात ( काय दिवे लावणार आहात ?) 5) घरी जाऊन पण काम असते ( आम्ही पण कामं […]

शेवगा (ड्रमस्टिक) – आहारातील पौष्टिक कॅप्सुल

दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन “सांबार’मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला “वंडर स्टीक’ तर झाडाला “ट्री फॉर लाईफ’ असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या […]

1 84 85 86 87 88 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..