जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे चौपन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग बारा जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात, बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये. यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते. आजच्या काळानुसार […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे त्रेपन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे बावन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दहा आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे एकावन्न आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग नऊ ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे पन्नास आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग आठ जनावरांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला ग्रंथकार सांगतात. जे प्राणी शारीरिक दृष्टीने कमजोर झाले आहेत, किंवा भुकेलेले आहेत, व्यंगयुक्त आहेत, अशा प्राण्यांच्या वाटेला जाऊ नये, त्यांच्याशी सावधपणे वागावे. ज्यांच्या पाठीवर स्वार व्हावे लागते अशा घोडा आदि पशु […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे एकोणपन्नास आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग सात न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च ! कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये. मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर […]
एखादी अमंगल म्हणजे वाईट गोष्ट अथवा वस्तूची सावलीही ओलांडून जाऊ नये. राख, तृण, विष्ठा, उष्टे खरकटे, पवित्र दगड, वारुळाची माती, एखाद्याच्या नावाने दिलेला बली, विनाकारण ओलांडून जाऊ नये. एखाद्याने स्नान केलेली जागा देखील ओलांडू नये. […]
जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सत्तेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही. भर दुपारी, सूर्योदय […]
बाहेर जाताना पायात चप्पल, हातात काठी, आणि छत्री घेऊन बाहेर पडावे. जमिनीवरील दगड माती, काटे, चिखल, पायांना लागू नये, आपल्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे, म्हणून हे सर्व पहावे, असे ग्रंथकारांना सांगायचे आहे. वरवर पहाता ” एवढे काय सांगायचे त्यात, एवढे बुद्धु नाही आम्ही” असं वाटणं चुक नाही. पण अश्या अनेक जागा आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत, जिथून आपल्याला धोका संभवू शकतो. […]
आपले कार्य उत्तम व्हावे असे वाटत असेल तर कल्याणकारी रत्न, गुरु, माता पिता, आदि पूज्य व्यक्ती, यांना वंदन करून, तसेच तूप खाऊन बाहेर पडावे. मुद्दाम हा विषय इथे सांगण्याचे कारण आज तुपाला एवढी नावं ठेवली जातात, इथपर्यंत मजल पोचली आहे, की तुप म्हणजे जणु काही विषच म्हणे ! घोर कलियुग म्हणतात, ते हेच. […]