नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे. यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तीन

आयुर्वेद समजून घेताना विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दोन

आयुषोवेदः आयुर्वेदः आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र. आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र. याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान. आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा. जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात […]

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग एक

अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ? नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ? ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ? एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज ! केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ? अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह अंतिम भाग २५

आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि । नवान्नपानं गुडवैकृतंच प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।। मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ? प्रमेह होऊ नये म्हणून अंगाला घाम आणून । शरीरातील क्लेद काढून राहून सदैव दक्ष । आहारावर असावे लक्ष ।। 1।। प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

“दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?” “आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?” कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २३

पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २२

श्लोकातील पुढचा शब्द आहे, ग्राम्यौदक आनूपरसः ग्राम्य म्हणजे गावातील. गावातील काय काय ? रस म्हणजे जल किंवा पाण्याशी संबंधीत, आनूप म्हणजे पाणथळ ओलसर जागी रहाणारे पशुपक्षी, प्राणी, मासे, त्यांचे मांस दूध आदि. तसेच या प्रदेशातील फळे, पालेभाज्या इ पिके. एवढी या विषयाची व्याप्ती आहे. हे केवळ उक्त आहे. न सांगितले गेलेले ते तेवढेच अनुक्त आहे. अनुक्त […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २१

जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो. कफ वाढतो, म्हणजे खोकल्यातून बाहेर येतो तो कफ नव्हे हो! हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच ! हा कफ म्हणजे विकृतरीत्या वाढलेला कफ दोष. जो प्रमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह हा ज्याचा एक उपप्रकार आहे, त्याला प्रमेह म्हणतात. ग्रीष्म ऋतु सोडला तर दुपारची झोप वर्ज्य सांगितली आहे. ग्रीष्मात बाहेर उष्णता खूप […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २०

प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख. स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे! नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे. झोप अशी हवी की, तिला अन्य […]

1 19 20 21 22 23 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..