दुधाचा विषय सुरू असल्याने त्यानंतरचा बनणारा पदार्थ म्हणजे दही. प्रमेह होऊ नये म्हणून जो श्लोक आधी वर्णन केला आहे, त्यातील पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, दधिनी. खरंतर दुधानंतर दही बनते, पण शास्त्रकारांनी त्याच्यासाठी मानाचे स्थान निर्माण करून श्लोकात दुधाच्याही आधी बसवले. एवढे विशेष लक्ष देण्यासारखा हा आंबट पदार्थ साखरेच्या आजाराचे कारण असू शकतो ? वरवर पहाता, हे […]
बालकांसाठी मातृस्तन्य सर्वोत्तम. आईचे नसेल तर दायीचे. नसेल तर गाईचे ! त्याच्यापुढे जाऊन म्हैशीचे दूध प्यायले तर कफ आणखीनच वाढेल. म्हणजे तेही नको. अजूनही काहीजणांना नेमकेपणाने कळले नाही. दूध प्यावे की नाही ? प्यावेतर दूध कधी प्यावे ? खरं सांगायचं तर आयुर्वेदीय दिनचर्येमधे तर सकाळी चहा पण नाही आणि दूध पण नको. दिनान्ते म्हणजे सायंकाळी चालेल. […]
दुध उत्तम प्रतीच्या उत्तम गाईचे जरी असले तरी ते पचवायला प्रकृती आणि भूक तेवढीच उत्तम लागते. पुनः आवडायला हवे. आणि अन्य अन्नाची त्यात भेसळ नको. बालकांची गोष्ट वेगळी. त्यांना अक्कल फुटेपर्यंत आवड निवड तशी कळत नाही. प्रकृती समजत नाही, भूक सणसणीत असते. मातृस्तन्याखेरीज अन्य काही पोटात जात नाही. फक्त दूधच पोटात गेले तरी वय कफाचे असले […]
काही प्रश्न काही जणांच्या मनात काल उपस्थित झाले……… आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत, आमचा प्रोटीन्सचा सर्वात मोठा पर्याय म्हणून आम्ही दुधाकडेच पहात होतो, मग आम्ही असे पौष्टिक दूध पिणे बंद करायचे का ? असे भावनिक होऊन नाही चालणार ! दूध म्हणजे अमृततुल्य आहे, हे जरी सत्य असले तरी व्यवहार पण लक्षात घ्यावा. दूध पचायला जड असते. टिकाऊ […]
केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच ! दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत […]
दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे. काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ […]
मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे. आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी ग्राम्यौदकः पयांसि नवान्नपानं गुडवैकृतंच प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ! हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे. काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी ‘काय करू नये’ ते पहिल्यांदा सांगताना दिसतात. मनाचे […]
पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील ! यांच्यातील काही साम्य. दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे. यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही. दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज. आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र ! मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे. पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही […]
पाण्याची प्रशंसता भाग तीन जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते. जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते. जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते. कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे […]
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया. आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे. देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच […]