आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे. पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच. भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत. एकेकाळी भारत हाच […]
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते. म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते. लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही. ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे […]
शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही. मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत. डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. […]
जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही. जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये. जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये. आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ? एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे […]
गहू खायचा नाहीतर तांदुळ ! एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो. गहू बंद केला तर कल्पना सुद्धा करवत नाही. मग डब्यात काय देणार ? यांना काय सांगायला जातेय, आम्हाला वेळच नाही, आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ? नुसतं हॅवाॅक आहे झालं !! सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या […]
सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी. काय शाकाहार, काय मांसाहार काय असेल ते खाऊन घ्या गपचुप. शेवटी पोट भरण्याशी मतलब ना ! सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ? हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची […]
आता काय करू? कोकणात गहू वापरायचा नाही तर आता काय करू ? आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे आता काय करू ? गहू सोडता येणार नाही. आता काय करू ? सुखाची एवढी सवय झाली आहे आता काय करू? जसा प्रदेश, तसा आहार जसा आहार, तशी शरीरयष्टी जशी शरीरयष्टी, तसे काम जसे काम, तसा आहार. […]
जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी […]
गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते. आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ? “मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता […]
रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत. भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही. जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो. चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या […]