शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता? भात किंवा भाकरी. प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते. ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो. बाजुला पोळी असते. आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. […]
जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ? असं चालत नाही किंवा पुरत नाही. जेवण्यातून समाधान मिळत असते. अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच […]
हा खेळ आकड्यांचा पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे. आपण अगदी मुळापर्यंत जाऊ. अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, […]
पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो, आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ? आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात, खरं वाटत नाही. पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ? आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय. नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ? कालच्या आरोग्यटीपेवरील […]
पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ? पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत. जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे […]
आपल्याला चुकुन खूप राग आला तर आपण सहजपणे काय म्हणतो ? “कच्चा चबा के खा जाऊंगा” याचा दुसरा अर्थ असा होतो की, आपल्या भावना बदलल्या की राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा भावना तीव्र असतातच, पण त्या आणखीन तीव्र होण्यासाठी कच्चं खाण्याची भाषा केली जाते. याचा अर्थ असा आहे, की कच्चे अन्न खाऊ नये. भावना बदलतात. […]
जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ. आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही. बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील […]
अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात. झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ? मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा […]
कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे. भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या […]
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो. अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ? कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते. अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा […]