जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा. आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये. जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते. जर पहिला घास […]
आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ? कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात. वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास […]
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही. वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे. […]
ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ? आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका. आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी […]
पाय आणि मांडी दुमडुन जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत. दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते. टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(……. आणि पोट दिसतच नसल्याने किती […]
पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ? त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे. आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून […]
ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात. ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात […]
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच. ऊष्टे खाण्यात मोठा दोष, जंतु संसर्ग हा आहे. आपण पाणी […]
जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे. मौन पाळणे ही कला आहे. बाहेर न बोलल्यामुळे आतमधे संवाद सुरू होतो. आणि मनाची ताकद जबरदस्त वाढते. कधीतरी अवयवांशी संवाद साधावा. आतमधे जागा किती आहे. घेतलेल्या आहाराने सारे अवयव […]
आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे. नैवेद्य दाखवून सहा चवींनी सज्ज असलेले […]