जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ? आयुष्य कमी होतं. त्याने काय होतं ? जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव […]
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे. अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात. अशा […]
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्त म्हणजे जाणकार. ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे. प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, […]
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौदा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। आप्तोपसेवीच…. या शब्दाचा अर्थ आप्तांची सेवा असा होतो. आता आप्त कोण ? आणि सेवा म्हणजे काय ? आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध शोधायचा. ग्रंथकार म्हणतात, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे आप्त. […]
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा• नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः । दाता समः सत्यपरः क्षमावान आप्तोपसेवी च भवति अरोगः ।। ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ? क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच […]
तेरा गुणांचा विडा आपल्या शरीरासाठी आहे.घेतलेला आहार सहजपणे पचून जावा यासाठी हे पान तयार करून खाल्ले जाईल, पचन पूर्ण ही होईल. पण मनोरोगांचे काय ? त्यातील आमाचे पचन कोण करणार ? आत्मरोगांचे काय त्यासाठी हे हिरवे नागवेलीचे पान काऽही उपयोगाचे नाही. […]
सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे. […]
कोणतेही शुभकार्य करत असताना देवाला देखील मानाचा विडा द्यायची श्रद्धा आहे. त्यामागे असलेले आरोग्याचे तेरा संदेश मात्र ओळखता यायला हवेत. पाश्चात्य बुद्धीने विचार केलात तर मात्र तीन तेरा वाजलेच म्हणून समजा ! […]
धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे. […]
पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !
पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही. […]