नवीन लेखन...

ज्योतिष्मती / मालकांगोणी

ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व […]

वरूण – वायवर्ण

वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे. […]

लताकरंज/सागरगोटा

ह्याचे मोठे प्रसरणशील काटेरी गुल्म असते.खोड व फांद्यावर काटे असतात.पाने ३ सेंमी लांब पक्षाकार असून फुले फिकट पिवळ्या रंगाची मंजिरी स्वरूप असतात.खालचे फूल फळात रूपांतरित होते.फळ ६ सेंमी लांब,चपटे,काटेरी व आत १-२ बिया ज्याला आपण सागर गोटा म्हणतो त्या असतात.बिया गोलाकार,निळसर करड्या व कठिण आवरण असलेल्या असतात. ह्याचे उपयुक्तांग बीज असून ते चवीला तिखट,कडू,तुरट असून उष्ण […]

बाकूची/बावची

ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो. बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे […]

कपिकच्छू/खाजकुहिली

पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते. ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ […]

दारूहरिद्रा/दारूहळद

ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो. दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची […]

खदिर / खैर

खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे. […]

मदनफळ

ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात. ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व […]

मंजीष्ठा

मंजीष्ठाची अनेक फांद्या असलेली प्रसरणशील आरोहिणी वेल असते.ह्याचे काण्ड चौकोनी व गुलाबी लाल रंगाचे असते.पाने हृदयाकृती,टोकदार ५-१० सेंमी लांब व वरच्या भागात खरखरीत व मागील भाग मऊ व लव युक्त असतो.ह्याचा देठ पानांपेक्षा मोठा व दुप्पट लांब असतो.त्याच्यावर काट्यासारखे भाग असतात.चार पानांच्या चक्रातील २ पाने लहान व २ पाने मोठी असतात.फुल ०.३-२.५ सेंमी लांब मांसल गोलाकार […]

सर्पगंधा

सर्पगंधाचा सरळ सदाहरित १-३ फूट उंच क्षुप असतो.ह्याची पाने ३-७ इंच लांब व २-२१/२ इंच रूंद अण्डाकार अथवा भालाकार व तीक्ष्णाग्र असतात.पानांचा वरचा भाग गडद हिरवा व पृष्ठभाग हल्का हिरवा असतो.प्रत्येक काण्डपर्वातून ३-४ पाने निघतात.फुले पांढरी अथवा गुलाबी गुच्छामध्ये येतात.फळ मटराच्या आकाराचे कच्चे हिरवे व पिकल्यावर काळे होते.मुळ दृढ असून ४० सेंमी लांब व २ सेंमी […]

1 2 3 4 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..