जपा/जास्वंद
लाल जास्वंद हि आपल्या लाडक्या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे.प्रत्येकाच्या अंगणात हि हमखास आढळते.आजकाल ह्याचे कलम करून अनेक रंगांची,अनेक जातींची जास्वंद आपल्याला पहायला मिळते.पण जी गावठी जास्वंद लाल किंवा पांढऱ्या रंगाची असते तिच औषधी असते.त्यामुळे औषधी उपयोगीकरिता तिच वापरली जाते. जास्वंदीचा अनेक शाखा प्रशाखायुक्त गुल्म असतो.ह्याची पाने लट्वाकार,स्निग्ध,चमकदार,लांब टोकाची,खाली अखंड व वर दन्तुर कडा असलेली असते.फुले […]