करवीर/कण्हेर
।। विकटाय नम: करवीरपत्रं समर्पयामि।। ह्याचे तीन मीटर उंचीचे क्षीरी गुल्म असते.पाने १०-१५ सेंमी लांब व २.५ सेंमी रूंद असतात व भालाकार असतात.फुले पांढरी/लाल उग्रगंधी व शेवटी मंजीरी स्वरूपात उगवते.फळ ८-१० सेंमी चपटे शेंग स्वरूपात असते व त्यात हल्क्या भुरकट रंगाच्या बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व मुलत्वचा.ह्याची चव कडू,तिखट,तुरट असून हे उष्ण गुणाचे असते […]