MENU
नवीन लेखन...

दुसर्‍या महायुद्धातील ‘ही शर्यत रे अपुली’

शर्यत दोन वा अधीक प्रतिस्पर्ध्यांमधे असते. ती स्थळ काळ ठरवून होते. स्पर्धकांना एकमेकांच्या तयारीचा अंदाज असतो. ससा आणि कासव हे मित्र धावण्याची शर्यत ठरवतात. तयारीत ससा वरचढ असल्याचे माहीत असते. पण अनपेक्षितपणे कासव ही शर्यत जिंकतो. अशीच एक शर्यत दुसर्‍या महायुद्धात लागली होती. ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा दुसरा लेख. […]

दुसर्‍या महायुद्धातील ‘समज गैरसमज’

दुसर्‍या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख. […]

मुत्सद्दी शिवाजी महाराज

आपल्याला शिवाजी महाराज हे कर्तव्यदक्ष, मुत्सद्दी,प्रजेची काळजी वाहणारे म्हणून माहिती आहेत .पण ज्या इंग्रजांनी पुढे आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या इंग्रजांना मूर्ख बनवले होते हे आपल्याला ठाऊक नसते. […]

बाजीप्रभू देशपांडे

एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव. […]

श्री स्वामी समर्थांच्या हातातील सूर्यमणी

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर मराठी माणसांची मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे. श्री दत्तगुरुंचे अवतार मानले गेलेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलोट येथे अनेक वर्षे वास्तव्याला होते. या काळात अक्कलकोटचे राजे  श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले  यांची स्वामींवर अपार श्रद्धा बसली. श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांची पहिली भेट जुन्या राजवाड्यातील श्री गणेश पंचायतन मंदिरात झाली […]

बडोदा वस्तूसंग्रहालय

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती. […]

दिल्ली नावामागचा इतिहास

दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय. […]

कौपिनेश्वर मंदिर, ठाणे

श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते. […]

शिवराय लेणी स्थापत्य

वे’रुळ व एलोरा किंवा अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांची निर्मिती जरी इ. स. १ ते इ. स. १४ च्या दरम्यान झाली असली तरी त्या आपल्याला आता आता म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानवर होतं त्या काळात जगाला वेरुळ कळाल्या. डोंगररांगांमध्ये ही निर्मिती झाली. जळगावजवळ अजिंठा तीन डोंगरांमध्ये अजिंठा लेण्यांत चित्रकला साकारली. या व अशा प्रकारच्या लेण्या या महान राष्ट्रात… ‘महाराष्ट्रात’ सुमारे एक हजारांवर आहेत. […]

झापगावचा प्राचीन भूपतगड

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]

1 2 3 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..