१७७६ ची पहिली ब्राम्हण रेजिमेंट
पूर्वापार शास्त्र धारण करणाऱ्या ब्राम्हण समाजाने वेळोवेळी शस्त्र धारण करून अतुल क्षात्रतेज दाखविल्याचे हजारो दाखले पुराणकाळापासून आढळतात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा ब्राह्मण – क्षत्रिय अशा जाती नव्हत्याच. एकेका प्रकारचे व्यवसाय, कर्मे, कार्य, जीवन पद्धती जोपासणारे अनेक समूह होते. आज आपण ज्याना जाती म्हणतो अशा कुठल्याही जातीतील कुणीही व्यक्ती, तप ( ज्ञान मिळवून ) करून अत्यंत विद्वान ऋषी – मुनी होत असत. हिंदू धर्मातील हजारो ग्रंथ अशाच ऋषी – मुनींनी लिहिलेले आहेत. यालाच नेमका सुरुंग लावला तो ब्रिटिशांनी ” जातीच्या वाती ” कुशलपणे पेटवून ! […]