नवीन लेखन...

डेनीस ब्लोश — दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

डेनीस ब्लोशचा जन्म पॅरिस मध्ये २१ जानेवारी १९१६ रोजी पॅरिस येथे एका ज्यू कुटुंबात झाला.तिला तीन भाऊ होते. १९४० मध्ये त्यापैकी दोन भाऊ व वडील फ्रेंच लष्करात होते.  त्यांना १९४० मध्ये जर्मनांनी तुरुंगात टाकले.ती,तिची आई व एक भाऊ तुरुंगवास टाळण्यासाठी खोटी ओळख व कागदपत्रे मिळवून  भूमिगत आयुष्य जगत होते. […]

क्रिसटीना स्कारबर्क–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

क्रिस्टीना स्कारबेक,चा जन्म १ मे १९०८ ला एका संपन्न ज्यू घरात  झाला.तिला वडिलांप्रमाणे घोडेस्वारीचा,.स्कीईंग करण्याचा छंद होता.या सगळ्याला तिच्या वडिलांचे प्रोत्साहन होते.१९२० मध्ये त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्यांना वॉर्सोमध्ये स्थलांतर करावे लागले.घरच्यांवर बोजा होऊ नये म्हणून तिने फियाट मोटार मध्ये डीलर म्हणून काम केले. […]

आदर्श राजमाता जिजाऊ

कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे . […]

सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले. […]

नवरात्रातील गणपतीची कहाणी..

प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात… जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा…. अश्विन महिन्यात… नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची ! […]

पोस्टाची खिडकी

पोस्टाची खिडकी टपालासाठी रेल्वे ची खिडकी तिकिटासाठी सिनेमाची खिडकी हाऊसफुल्ल साठी नाटकाची खिडकी श्री. सौ. साठी खिडक्याच खिडक्या त्यांना काय तोटा कुठे जाल तिथे पडेल त्यांच्याशी गाठ सापडेल का कुठे? कल्पवृक्षाची खिडकी? सापडलीच तर एकच वाटते खंत पाळी येईल तेव्हा ती होऊ नये बंद! — विनायक अत्रे.

दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत. […]

पेशव्यांचे सेनापती तात्या टोपे

काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला १८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. १८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले. […]

इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर

थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
[…]

सवाई माधवराव पेशवे

सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले. […]

1 3 4 5 6 7 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..