पुनरुत्थान – गोव्यातील मंदिरांचे
सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरद्स्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या […]