नवीन लेखन...

उद्योग जगतातील घडामोडी याविषयी लेखन

बुलेट ट्रेनचा खरा चेहरा…!

हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल. […]

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक – प्रदीप ताम्हाणे

अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!! […]

बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस” ?

आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार “टाटा समूहाची” कंपनी “टाटा टेलिसर्व्हिसेस”..? विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या “टाटा” समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील ” टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices” या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या […]

मराठी व्यावसायिक आणि GST

गिरगावतल्या ठाकुरद्वारचं हॉटेल विनय इथं GST लागू झाल्यापासून खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आलेले आहेत… या हॉटेलमध्ये १ जुलै २०१७ पासून नवे रेट कार्ड आले आहे… हॉटेलच्या मेन्यू कार्डवर नवे आणि जुने दर स्पष्टपणे लिहिलेले आहेत… या नव्या दराचे परिणाम बिलात दिसतात. बिल ५ ते १०% कमी झालेले आहे… हा बदल झालाय तो GSTमुळे.. हे काही काल […]

‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले

आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू मन्मनच्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या […]

महाकाय चीनबद्दल

श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. […]

चिनी वस्तूंवर बहिष्कार एक स्वप्न !

चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे. […]

जाहीरात

बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच […]

सोनारांचे कान टोचण्याची गरज !

कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने  म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या …! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत […]

1 2 3 4 5 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..