या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम. हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील […]
प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा…. प्रति, संपादक, दैनिक लोकसत्ता. महाशय, आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची […]
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आले आणि “मेक इन इंडिया ” च्या गीतात मिले सुर मेरा तुम्हारा झाले. 2030 साली लोकसंख्येचा भारतीय भस्मासुर चीनच्या ड्रॅगनासूराला मात देत १४६ कोटीची उड्डाणे करणार. यातील 100 कोटी हात “ कार्यासज्ज ” म्हणजे 16 ते 59 वयोगटातील असतील. म्हणजे भारत उत्पादनाचे जागतिक केंद्र बनेल. प्रगत राष्ट्रांच्या गुंतवणुकीचा धबधबा भारतावर […]
ऐन जवानीच्या दिवसांत ‘मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है‘ हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत ‘पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा […]
मुंबईत जागांचे भाव एवढे कडाडले आहेत आणि त्यावर पालिकेचा ना प्रशासनाचे नियंत्रण आहे ! एखादी वन-रूम किचन किंवा वन-बीएचके जागा घ्यायची म्हंटले तरी सहज ७० ते ८० लाख रुपये मोजावे लागतात आणि ते सुद्धा जुन्या बिल्डींग मध्ये. सध्यातर मुंबईत वन-रूम किचन किंवा वन-बीएचके फ्लॅट बिल्डर मंडळी बांधतच नाहीत तर विकत घेणार कुठून? बरं जागा बघण्यास गेलो की […]
महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]
उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. 1) पैशांचे भांडवल 2) वेळेचे भांडवल 3) मनुष्यबळाचे भांडवल अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया. प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी […]
तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्या सदरामध्ये…. […]
आज देशात सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळा आहे आणि त्याची झळ प्रत्येक कुटुंबाला बसतेच पण त्यात जास्त त्रास सहन करावा लागतो त्या कुटुंबातील स्त्रीला आणि मग बाजारातील वस्तूंचे भाव कडाडलेले बघितले की साहजिकच तिच्या कपाळाला आठ्या पडतात. […]
रोज वाढणार्या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील. […]