नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

अंडाशयात साठलेल्या अनेक गाठींमुळे उद्भवणाऱ्या समस्या (उत्तरार्ध)

पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिण्ड्रोम (पीसीओएस) या आजाराची लक्षणे: १) अनियमित पाळी येणे व अति रक्तस्त्राव होणे. २) चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरूम येणे. ३) नको त्या ठिकाणी केसांची अधिक वाढ होणे (चेहऱ्यावर, छाती/ ओटी-पोटावर इत्यादी) केसांची अधिक वाढ होते. ४) लठ्ठपणा. ५) सोनोग्राफी तपासणी केल्यास | बीजांडाकोशात गाठीचा समूह दिसतो (पॉलिसिस्टीक ओव्हरी). ६) रक्तातील संप्रेरकाच्या प्रमाणात बदल होणे. […]

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग २)

डॉक्टरांना विचारावे. सोडियम असलेली औषधे किंवा खाद्यपदार्थ यामुळे रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच ॲटासीड, कॅनमधील खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, पापड-लोणची यांचे सेवन मर्यादित ठेवा. उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळ घ्यायची असल्यामुळे त्यांचे काही साइड इफेक्टस् दिसू शकतात. उदा. झोपून उठताना तोल जाणे, तोंड शुष्क होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, झोप न लागणे, मलावरोध इ. अर्थात हे साइड इफेक्टस् दिसतीलच असे […]

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग १)

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही. काही रुग्णांमध्ये […]

लसूण सोलायचं उपकरण

परवा बाजारात एका दुकानात लसूण सोलायचं उपकरण पाहून, मला धक्काच बसला! कारण ते उपकरण म्हणजे, लसणाच्या पाकळ्या आत सरकवता येतील एवढ्या व्यासाची फक्त एक रबरी ट्यूब होती. […]

आनुवंशशास्त्र (भाग ३)

नात्यातल्या नात्यात लग्न झाल्यास आनुवंशिक आजार उद्भवतात असे आढळते. नात्यातील लग्नात, उदाहरणार्थ आतेभाऊ- मामेबहीण वा मामा- भाची इ., नवरा व बायको दोघांचे आजोबा/ पणजोबा इ.एकच असल्याने त्यांच्यातील सदोष जनुके दोघांमध्ये येण्याची, म्हणजेच दोघेही ‘कॅरिअर’ असण्याची शक्यता वाढते. कोणीही कधीही गर्भार राहिलं, तर नवीन येणाऱ्या बाळात रचनेचा वा कार्याचा काही ना काही दोष आढळण्याची एरवी ३-५ टक्के […]

पिझ्झा कटर कसे काम करतो?

एखाद्या महिलेचा अभियांत्रिकी दृष्टिकोन चांगला असेल तर तिच्याकडे तुम्हाला कलिंगड किंवा पपईसारखं मोठ्ठ फळ कापण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त लांब पाते असलेली सुरी आढळेल. तसंच त्या सुगृहिणीकडे तुम्हाला पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ कापण्यासाठी गोल पातं असलेली सुरी आढळेल… […]

अनुवंशशास्त्र (भाग २)

घराण्यात कुठलाच आजार नसताना अचानक एका बाळात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार उद्भवू शकतो का? हा प्रश्न मनात येतो. रंगसूत्रांत वा गुणसूत्रांत गर्भ वाढत असताना नव्याने काही चुका/ दोष निर्माण होऊ शकतात. त्यातून वाढणाऱ्या गर्भात/ व्यक्तीत अनुवंशिक आजार दिसतो, मात्र तो आई-वडिलांकडून आलेला नसतो. अनेकदा जनुकांच्या दोन प्रतींमधली एक प्रत काम करीत नसते, मात्र दुसरी प्रत आवश्यक ते […]

आट्यापेक्षा मैदा अधिक लवचिक का?

तेव्हा मैदा आट्यापेक्षा अधिक लवचिक का असतो या प्रश्नाच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात घेऊया. पहिली म्हणजे आटा म्हणजे अख्या गव्हाचं पीठ! म्हणजे आटा तयार करतांना गव्हाच्या गुलाबी सालासकट त्याचं पीठ केलं जातं. मैदा करतांना गव्हाच्या आतल्या दाण्याचं पीठ करतात. […]

अनुवंशशास्त्र (भाग १)

आजच्या पद्धतीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही ‘स्पेशलायझेशन’ विशेष प्रावीण्य असणारे तज्ज्ञ आपल्याला दिसतात. स्त्री रोगतज्ज्ञ स्त्रियांचे आजार, प्रसूतिसंबंधी बाबी बघतात तर नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्यांचे विकार बघतात. अस्थिरोग, बालरोग, न्यूरॉलॉजी वगैरे विशेष शाखांबद्दल आपण ऐकतो, मात्र आनुवंशशास्त्रतज्ज्ञ किंवा जेनेटिसिस्ट हे नेमक्या कुठल्या प्रकारच्या आजारांचे, कुठल्या अवयवांचे डॉक्टर, हे ध्यानात येत नाही. हे नावच इतकं मोठं आणि उच्चारायला कठीण वाटतं, की […]

1 13 14 15 16 17 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..