हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात. काही कारणाने या बोगद्याची खोली कमी झाली तर ही मीडियन चेता दाबली जाते […]
पूर्वी दंतमंजन म्हणून पावडर स्वरूपात वनौषधींचा वापर होत असे. आता नीम, मिसवाक, लवंग, बाभूळ, पुदिना, पिंपळी यांसारख्या वनौषधींचा समावेश असलेल्या अनेक हर्बल टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कापूर, तोमर बीज या पदार्थांचा समावेशही काही टूथपेस्टमध्ये केलेला असतो. या वनौषधींमध्ये कोणती रसायने असतात, जी दातांचे संरक्षण करतात? दातदुखीसाठी लवंग तेलाचा वापर आजही केला जातो. लवंगेमध्ये ॲसिटाइल युजेनॉल, […]
नगटाच्या हाडाजवळ दुखणे ही एक सहजसामान्य तक्रार असते. त्यात हे दुखणे नजरेसमोर असल्याने आणि रोजच्या कामात व्यत्यय आणणारे असल्याने रुग्णांच्या लवकर लक्षात येते. मनगटाचा सांधा पिचल्यानंतर योग्य बसविला न गेल्यास रेडीयस या हाडाची लांबी कायमची कमी होते. सांध्याची हालचाल पूर्वीपेक्षा कमी होते व सांध्याची रचना बदलल्याने होणाऱ्या अयोग्य हालचालीमुळेही हा सांधा दुखू लागतो. याच सांध्यात संधीवाताच्या […]
रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. पिष्टमय आणि गोड पदार्थांचे तोंडात राहिलेले कण आणि तोंडातील बॅक्टेरिया यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते व त्याने दंतवल्कावर व (एनॅमलावर) अनिष्ट घडतो. परिणाम एनॅमलमध्ये कॅल्शियम […]
विज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत. […]
तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम […]
संधीवात म्हणजे सांध्याचे दुखणे. ‘संधिवात’ हे निदान नसूनलक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप हा मलेरिया, फ्लू अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतो, त्याचप्रमाणे संधिवातदेखील बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत संधिवाताला म्हणतात. (हुमॅटिझम) सांधेदुखी किंवा संधीवात दोन प्रकारचे असतात. १) झिजेचा/घर्षणाचा संधीवात (ऑस्टिओआर्थ्रोयटिस) हा वयोमानानुसार होणारा त्रास आहे. सांधा हा अर्थातच दोन हाडांचा झालेला असतो. या दोन हाडांमध्ये गादी […]
हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी […]
बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते. काही काळानंतर ती व्यक्ती न लंगडता चालू शकते; पण टाचांतील दुखणे थोड्याफार प्रमाणात राहते. आपल्या संपूर्ण […]
हल्ली अनेकांना खास करून शहरात राहणाऱ्या लोकांना उजव्या कोपराच्या बाहेर दुखू लागते. निरनिराळ्या गोळ्या वारंवार घ्याव्या लागतात. डॉक्टर टेनिस एल्बोचे निदान करतात. टेनिस हा खेळ न खेळतासुद्धा मला हा रोग कसा झाला याचे रुग्णाला आश्चर्य वाटते. हे दुखणे होण्यासाठी टेनिस किंवा बॅटमिंटनच खेळायला पाहिजे असे नाही. अधिक काम असलेल्या बाजूला हे दुखणे होते म्हणजे उजवीकडे असल्यास […]